बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सजग असावे; प्रा. मिलिंद रंगारी

भजेपार शाळेत पालक मेळाव्यातून पालकांचे समुपदेशन सालेकसा: बालक हा मातीच्या गोळ्यासारखा असतो त्याला शिक्षक आणि पालक जसा संस्काररुपी आकार देतील तसा तो घडत असतो. नेहमी सकारात्मक मानसिकता बाळगून बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सजग असावे असे प्रतिपादन जिल्हा समुपदेशक प्रा. मिलिंद रंगारी यांनी केले. सालेकसा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भजेपार येथे भजेपार शिक्षण कल्याण संघाच्या पुढाकारातून आणि शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायतच्या संयुक्त विद्यमाने पालक मेळाव्यातून पालकांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. दरम्यान पालकांनी केवळ आपले स्वप्न मुलांवर न थोपवता त्यांच्या आवडी निवडी आणि गुणवत्ता लक्षात घेऊन त्या त्या क्षेत्रात करियर करण्यासाठी मुलांना प्रेरित करावे. नकारात्मक विचारांना नेहमी दूर ठेवून बालकांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करावी. त्यांच्या समोर कोणतेही वाईट वर्तन अथवा व्यसन करू नये कारण बालके ही अनुकरण प्रिय असतात. शिक्षकांचे आणि पालकांचे ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.अशा परिस्थितीत आपल्याला आपले वर्तन अनुकूल ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर प्रश्नावली आणि चर्चा सत्राच्या माध्यमातून पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी मंचावर ग्राम पंचायत भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टेकराम बहेकार व सुभाष मौजे, मुख्याध्यापिका देवरे मॅडम, खुशालराव शिवणकर, संजय मेश्राम, दिनेश तिरेले, पंकज असाटी आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन सहायक शिक्षक राजेश भोयर, प्रास्ताविक प्रा.डॉ. विवेक बहेकार तर आभार प्रदर्शन लोकेश चुटे यांनी केले. गावच्या शैक्षणिक उत्थानासाठी गावातील युवकांनी हेमंत चुटे यांच्या संकल्पनेतून भजेपार शिक्षण कल्याण संघाची स्थापना केली असून प्रती महिना 300 रुपये देणगी प्रत्येक सदस्य जमा करतो. यात 38 सदस्यांचा समावेश असून सदस्य वाढतच आहेत. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण कल्याण संघाचे उमेश बहेकार, नंदकिशोर कठाने, कमल हेमने, नरेन्द्र बहेकार, मनिषा चुटे, पालीकचंद बिसने, वसंत ब्राम्हणकर, संतोष कोरे, विजय बहेकार, विनोद ब्राह्मणकर, जगन्नाथ चुटे, हंसराज बहेकार, शुभम मरस्कोल्हे, रेवत मेंढे, राजेश बहेकार, राकेश महारवाडे, महेश माहुरकर, अमोल बहेकार, सुभाष रहिले, नितेश कठाने, रवी बहेकार, सुष्मिता बहेकार, आशीष चुटे, शैलेश शेंडे, वासुदेव ब्राह्मणकर, राजेश वाकले, नितेश चुटे, विनोद बहेकार, दिलीप पाथोडे,अतुल मेन्ढे, प्रमोद पाथोडे,आशीष चुटे,शाम फुंडे, प्रकाश मौजे, रेवतचंद बहेकार, गुलशन पाथोडे, विजय पोगडे सहित स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष व संपूर्ण ग्राम वासियांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *