आमगाव नगरात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण व बाबासाहेबांना अभिवादन

आमगाव,ता.१५:येथील डाॅ.आंबेडकर चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व नगर समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी( ता.१५) ध्वजारोहण व बाबासाहेबांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक बबनसिंह ठाकूर होते.ध्वजारोहणकर्ता म्हणून समितीचे अध्यक्ष राजभूषण मेश्राम ,प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रविशंकर पाठक,सामाजिक कार्यकर्ता वेदवती पटले,जिल्हा परिषद सदस्या छबूताई उके ,सामाजिक कार्यकर्ता गजानन डोंगरे ,वसंत मेश्राम उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राजभूषण मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी नगरातील मान्यवर व नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रमण हुमे यांनी केले व आभार प्रशांत रावते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *