डॉ. सारिका शाह यांना शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार

नुकत्याच नाशिक येथे सिन्नर जिल्हयात संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्यावतीने महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना गुणगौरव करून त्यांना ‘शिव छत्रपती’ महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात यवतमाळ येथील डॉ. सारिका शाह यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रातुन उत्कृष्ट कार्य करणारे गुणीजनांची निवड करून त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले..डॉ. सारिका शाह यांनी नेहमी विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलींचे सक्षमीकरण आणि आरोया विषयी निःशुल्क शिबिर घेवून आपली सेवा देवून समाजात विविध उपक्रम घेतले आहे. त्यांना याआधी विविध पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा २४ जून ला अण्णाभाऊ साठे सभागृह, सिन्नर येथे पार पडला. कार्यक्रमात सन्माननिय अतिथी म्हणून राज्याचे मंत्री माननिय आमदार महादेव जानकर, माननिय नाथाभाऊ शेवाळे, माननीय माणिकराव कोकाटे, कृष्णराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर अतिथींच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सारिका शाह यांचा या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *