तालुक्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा :– विजय कापगते

अर्जुनी मोर. :– अर्जुनी मोरगाव तालुका हा धान उत्पादनासाठी सर्व दूर प्रसिद्ध आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी हंगामात केवळ धानाचे उत्पन्न घेतले जाते. त्यासाठी तालुक्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 साठी सुरक्षित शेतकरी देशाचा अभिमान हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री समितीचे उपसभापती तथा तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा काढल्या जात आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत असून या योजनेपासून कोणत्याही शेतकऱ्यांनी वंचित राहू नये. नैसर्गिक आपत्ती कीड आणि अन्य रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे आणि त्यांना नाविन्यपूर्ण व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देऊन शेती व्यवसाय निरंतर सुकर राहील याची काळजी घेणे हे या पिक विमा योजनेचे उद्दिष्ट आहे. पीक कर्ज घेणारे व पीक कर्ज न घेणारे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात .पिक विमा योजनेसाठी आधार कार्ड ,सातबारा, बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स घेऊन 31 जुलै पर्यंत जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहनही विजय कापगते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *