आ. विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते अल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत तिरोडा येथे ५०.०० लक्ष रुपये मंजूर

विकास कामांचे भूमिपूजन संपन्न. तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक भागात विकास कामांसाठी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी एकूण ५०.०० लक्ष शासनाकडून मंजूर करवून घेतला असून त्यापैकी तिरोडा येथे कब्रस्थानात विविध विकासकामांचे भूमिपूजन आज आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने तिरोडा मुस्लीम कब्रस्थान येथे पेव्हिंग ब्लॉक लावणे, आवारभिंत बांधकाम करणे, शेड बांधकाम करणे, शौचालय बांधकाम करणे, विद्युतीकरण करणे अशा एकूण ५०.०० लक्ष कामांचा समावेश आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने श्री.मदनभाऊ पटले, श्री.डॉ.लक्ष्मण भगत, श्री.संजयसिंग बहेस, सलीम जवेरी, सदर हाजी सलाम शेख, वशीम शेख, जुनैद जवेरी, गनी भाई, जॉनी शेख, मजीद बाबा पठाण, सदर कलाम भाई, अकबर भाई सैयद व कब्रस्थान कमेटीचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *