मिडालेला मोबाइल केला पोलिसांच्या स्वाधीन

दिनांक 18/07/ 2023 रोजी, आशुतोष दसाराम लाडे राहणार आमगाव हे आपल्या घरी असताना VIVO कंपनीचा ANDROID मोबाईल घरासमोरील रोडवर मिळून आला. आजूबाजूला विचारपूस करूनही मोबाईल चे मालकीबाबत कोणीही मिळून न आल्याने त्यांनी तो मोबाईल पोलीस स्टेशन आमगाव येथे आणून दिला. पोलिसांनी मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेतला. मोबाईल मालक अतुल प्रमोद पारधी रा. म्हसगाव ता. गोरेगाव जि. गोंदिया यांना पोलीस स्टेशन आमगाव येथे बोलावून त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. आशुतोष दसाराम लाडे राहणार आमगाव यांचे प्रामाणिकपणाबद्दल पोलीस विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व भावी आयुष्या बद्दल सदिच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *