महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगरचे साहित्य पुरस्कार जाहीर

नागपूर : महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेच्यावतीने देण्यात येणार्‍या विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यानी काल केली. यात नागपुरातील लेखिका रश्मी पदवाड मदनकर ह्यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित *पद्मकोश* या पत्ररूप चरित्रात्मक कादंबरीला पंढरीनाथ जोशी पुरस्कृत *मोहन भास्कर जोशी स्मृती पुरस्कार* जाहीर करण्यात आला आहे.

खालील साहित्यकृतीना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.१.पंढरीनाथ जोशी पुरस्कृत विशेष पुरस्कार-*मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती पुरस्कार*-नाती वांझ होताना(कवितासंग्रह)मनीषा पाटील-हरोलीकर -देशिंग हरोली अन्य पुरस्कार पुढील प्रमाणे२.दिगंबर यादव पुरस्कृत*पद्मीनी कृष्णा यादव स्मृती पुरस्कार*- तुकोबा(कवितासंग्रह)डाॅ.राजेंद्र दास,कुर्डुवाडी३)लहु ढगे पुरस्कृत *सिध्दमाला ढगे स्मृती पुरस्कार* राजकिय मानदंड भाई गणपतराव देशमुख(चरित्र) प्रा.डाॅ. किसन माने,सांगोला४.गिरीश पंडित पुरस्कृत *मारोतीराव पंडित स्मृती पुरस्कार*हिप्पोक्रेटिसची शपथ-(कादंबरी),डाॅ.ऊर्मिला चाकुरकर,पैठण५,डाॅ. शरद शिर्के पुरस्कृत *इंदुमती शिर्के स्मृती पुरस्कार*हरवलेल्या कथेच्या शोधात(कथासंग्रह)सिताराम सावंत, सांगोला.६.प्रकाश जडे पुरस्कृत *इंदुमती जडे स्मृती पुरस्कार* मुक्ता (कादंबरी)प्रतिभा जगदाळे, सांगली ७. संभाजी सलगर पुरस्कृत *ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार*पिपाणी – (ललित)विजय शेंडगे,पुणे८.पंढरीनाथ जोशी पुरस्कृत *मोहन भास्कर जोशी स्मृती पुरस्कार*पद्मकोश(कादंबरी)रश्मी पदवाड-मदनकर, नागपुर.९.प्रा.पठाण शिवशरण पुरस्कृत *मसाजी शिवशरण स्मृती पुरस्कार*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता-प्रा.डाॅ.संभाजी पाटील(संशोधनात्मक संपादन)लातुर१०.श्रीमती ठोंबरे पुरस्कृत *शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती पुरस्कार* ग्रामीण कादंबरीतील स्री प्रतिमा-प्रा.डाॅ.संतोष देशमुख (संशोधनात्मक)औरंगाबाद११.उदय इंगळे पुरस्कृत*अमोल इंगळे स्मृती पुरस्कार* सुरस धातु गाथाप्रा.डाॅ.सुनिल विभुते(बालसाहित्य)बार्शी१२.इंद्रजित चव्हाण पुरस्कृत *सुरेश दत्तु स्मृती पुरस्कार*हिरवी हिरवी झाडे-प्रा.सुभाष कवडे(बालसाहित्य)भिलवडी१३.श्रीमती वासंती मेरु पुरस्कृत *वासुदेव शंकर मेरु स्मृती नवउन्मेष पुरस्कार*यशवंती शिंदे(मंगळवेढा)१४.श्री.निशिकांत परचंडराव पुरस्कृत *वैकुंठवासी चंद्रकला प्रल्हाद परचंडराव स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार*कल्याणराव शिंदे(पंढरपुर)या पुरस्कारांची निवड डाॅ.दत्ता सरगर यांचे अध्यक्षतेखाली रेखा जडे, प्रा.विश्वनाथ ढेपे,भारती धनवे,सचिन गालफाडे यांचे समितीने केली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.सर्व पुरस्कार विजेत्यांचे शाखा अध्यक्ष प्रकाश जडे यानी अभिनंदन केले असुन सदर पुरस्कारांचे वितरण लवकरच मान्यवरांचे हस्ते समारंभपुर्वक होईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *