अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल थकल्याने विद्युत पुरवठा होणार खंडित


अठरा गावांचा पाणीपुरवठा होणार खंडीत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता……
सविस्तर वृत्त असे की एका बाजूला केंद्र सरकार जल जीवन विसरअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून प्रतीक व्यक्ती 55 लिटर पाण्याच्या दराने पाणी मिळावा म्हणून प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही गोठणगाव तलाव येथील पाणी उचलून ते जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्वच्छ करून अर्जुनी मोरगाव नगरपंचायत व इतर अठरा गावांना मागील बारा वर्षापासून नियमित पाणीपुरवठा करत आहे, मागील काळामध्ये राज्य सरकारकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून सुरुवातीला 50 टक्के अनुदान प्राप्त झालेत त्यामुळे योजना चालवताना येणारा खर्च व होणारी वसुली यामधील तूट भरून निघत गेली, परंतु मागील तीन वर्षापासून राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान देणे बंद केले व त्यामुळे जिल्हा परिषदेला विद्युत बिल भरणे अशक्य झाले आहे
या परिस्थितीमध्ये आज घडीला दहा लक्ष 98 हजार रुपयाचे बिल विद्युत वितरण कंपनीचे थकीत झाल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करण्याचे नोटीस मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना दिलेले आहे, येणाऱ्या काही दिवसातच अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत खंडित होऊन अठरा गाव व एक नगरपंचायत येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर योजना ही जिल्हा परिषदेला हस्तांतरित असून सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समिती द्वारा संचालित खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळ या द्वारे चालविण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे झालेल्या करारनाम्यामध्ये देखभाल दुरुस्ती व विद्युत बिलाचे खर्च हे जिल्हा परिषद नियमित आजपर्यंत भरत आली. मागील मार्च महिन्यापासून जिल्हा परिषदेकडे विद्युत बिल भरायला पैसे नसल्यामुळे दहा लक्ष 98 हजार रुपयांचे बिल थकीत झाले आहे नुकतेच विद्युत वितरण कंपनीने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना आठ दिवसात विद्युत बिल भरा अन्यथा विद्युत खंडित केल्या जाईल अशी सूचना पत्र दिलेले आहे, त्यामुळे काही दिवसातच तालुक्यातील सर्वात मोठी अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही बंद होऊन तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे,
समाविष्ट गाव नगरपंचायत अर्जुनी मोरगाव, गोठणगाव, सुरबन, बोंडगाव सुर. कराडली ,गंधारी ,प्रतापगड, रामनगर अर्जुनी मोर, मोरगाव, निलज, माहूरकुडा, मालकनपूर, ताडगाव, झरपडा ,बुदेवाडा, बोळदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *