राष्ट्रीय स्तरावर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी वाढविला गोंदिया जिल्ह्याचे नाव – जयश्री पुंडकर

जयश्री पुंडकरभारत सरकार गृहमंत्रालयाकडून विदर्भातील एकमेव पोलीस स्टेशन अर्जुनी मोर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली.कायदा सुव्यवस्था गुन्हेगारी प्रतिबंध दोष सिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. अर्जुनी मोर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड झाली त्यावेळी कार्यरत असलेले गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष नेतृत्व गुण संपन्न असलेले पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनामध्ये कार्य करून राज्यस्तरावर गोंदिया जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. अशा शब्दात जयश्री फुंडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त करून त्यांचे गौरव केले.सूर्यवंशी यांचा हा सत्कार जयश्री फुंडकर जिल्हाध्यक्ष त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन करण्यात आले यावेळी जिल्हा सचिव वंदना बैस ओम पारधी सुनंदा येरणे तालुकाध्यक्ष आमगाव शोभा डोये अतुल फुलंके यांच्या उपस्थितीत शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनात संघटना पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *