नमस्ते नाशिक फाउंडेशन कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व पावसाळी साहित्य वाटप

नासिक
नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक संस्थेतर्फे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंबरठाण तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना, शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामध्ये रेनकोट, छत्री, वह्या अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे.

शाळेतील 240 विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव, सुनिता वाणी, संदीप देव, रिदम, साहिल ,भूषण तलवारे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी उंबरठाण बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ नेहा शिरोरे मॅडम, पंचायत समिती सदस्य विजय घांगळे, सरपंच गिरीश गायकवाड, उपसरपंच शिवराम गावित, सदस्य माधव पवार ग्रामपंचायत सदस्य, पेसा कमिटी अध्यक्ष सुरेश चौधरी, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, मधुकर खोटरे, आदी मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंजुळा गावित, जयराम धूम, मनोहर चौधरी, राजेंद्र गावित, सुमित्रा जाधव, संगीता भोये, राहुल सावळे, योगिता महाले, सिताराम वळवी, पंडित गावंडे, भागा चौधरी आधी शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले. विजय इंगळे व गिरीश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आभार मानले. तसेच सूत्रसंचालन राजेंद्र गावित यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *