MPSC मधे गोंदिया जिल्ह्यातील धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे हे मागासवर्गवारीतून प्रथम

कृषी सेवा मुख्य परीक्षा अंतिम निकाल जाहीर लोकसेवा आयोगातर्फे १० ते १३ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा २०२१ करिता मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये अमरावतीजिल्ह्यातील नीलेश देशमुख राज्यातून आणि गोंदिया जिल्ह्यातील धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे हे मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील भारती गावडे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *