मागण्या मान्य न झाल्यास समिती करणार 17 जुलै रोजी एक दिवसिय विराट धरणे आंदोलन

माननीय मुख्य लेखा व वित्त अधिकारी साहेब व शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन विविध मागण्या संदर्भात समिती पदाधिकाऱ्यांनी केली विस्तारित चर्चा_

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाने आपल्या संघर्षशील भूमिकेमुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न सचोटीने हाताळले आहेत.. या जिल्ह्यातील 100% कर्मचाऱ्यांना बहुप्रतिक्षित नक्षलभता पंधराशे रुपये कमाल मर्यादित लागू करणे, अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे, यशस्वीरित्या पाठपुरावा करून २०१२ पासूनचे gpf चे प्रलंबित प्रकरण निकाली काढणे, यासह अनेक शिक्षक बांधवांचे व विद्यार्थी, समाज हिताचे काम शिक्षक समितीने केले आहे. मागील वर्षी .25 जुलै 2022 , 15 सप्टेंबर 2022 व 1 नोव्हेंबर 2022 रोजी विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन जिल्हा परिषद समोर शेकडो शिक्षक बांधवांच्या उपस्थितीत शिक्षक समितीने यशस्वी करीत इतिहास रचना…शिक्षक समिती वारंवार शिक्षक बंधू भगिनींच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा- निवेदन देऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे परंतु शासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे राज्य व जिल्हा स्तरावरचे अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत.. खालील न्याय मागण्याच्या अनुषंगाने शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने काल दिनांक सात जुलै 2023 शुक्रवारला माननीय मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे साहेब व माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर महेंद्र गजभीये साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली… माननीय साहेबांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन समितीला देऊन 17 जुलै रोजी नियोजित विरारट धरणे आंदोलन मागे घेण्यास सांगितले… परंतु समिती पदाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या संदर्भात लेखी स्वरूपात इतिवृत्त मिळाल्या नंतरच आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विचार केला जाईल असे सांगितल

प्रमुख मागण्या 1)उच्च श्रेणी मुख्याध्यापक, हायस्कूल शिक्षक व पदवीधर विषय, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी ही 100% रिक्त पदे प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नतीने भरणे.2) शैक्षणिक सत्र 2022 -23 मधील परत गेलेला समग्र शिक्षा निधी तत्काळ शाळांना अदा करने 3) प्रलंबित मागील तीन वर्षापासूनचे चटोपाध्याय व निवड श्रेणीचे प्रकरने तत्काळ निकाली काढणे. 4) अप्रशिक्षित शिक्षण सेवक कालावधी चटोपाध्याय करिता गृहीत धरणे 5) शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतद्वारे भरण्यासंदर्भात आदेश पत्र निर्गमित करणे 6) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संगणक वसुली संदर्भातील होत असलेली कार्यवाही थांबवणे. 7) वेतन सुरक्षा मिळालेल्या व पदानवत करण्यात आलेल्या शिक्षक बंधवाची सेवानिवृत्तीच्यावेळी होत असलेली वसुली कार्यवाही थांबवणे. 8) जीपीएफ व DCPS संदर्भातल मार्च 2023 पर्यंतचा हिशोब शिक्षकांना देणे…. सोबतच जीपीएफ खाते ऑनलाईन करणे 9) हिंदी मराठी सूट, उच्च परीक्षा परवानगी, स्थायी व संगणक सूट, संदर्भातील प्रकरण निकाली काढणे.10)सरसकट शिक्षक बांधवांना एकतस्तर वेतनश्रेणी लागू करणे.11) पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत पडताळणी संदर्भातील प्रकरने तत्काळ वित्त विभागात सादर करणे.12) वैद्यकीय प्रतिकृती देयक संदर्भातील दिरंगाई दूर करून प्रकरण तत्काळ निकाली काढणे.13) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकरने व त्यासंदर्भातील देयक राशी तत्काळ अदा करणे.14) ज्या शाळांवर स्वयंसेवक म्हणून मागील सत्रात नेमणूक करण्यात आली त्यांचा उर्वरित मानधन तात्काळ अदा करणे… सोबतच जिल्ह्यात अनेक शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्या अनुषंगाने कार्यवाही करणे15) निकृष्ट दर्जाचा अन्नपुरवठा करणाऱ्या शालेय पोषण आहार पुरवठादारावर कार्यवाही करणे.16) 1991 नंतर जिल्ह्यात लागलेल्या व 2002 पासून एकस्तचा लाभ घेतलेल्या शिक्षकांना कार्यरत असेपर्यंत एकस्तरचा चर्चा लाभ देणे17) विविध शालेय शिष्यवृत्ती संदर्भात तालुकास्तरावर कॅम्प आयोजित करणे.18) आदर्श शिक्षक पुरस्कार अंतर्गत माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याचीकाकर्त्या शिक्षकांना एक वेतन वाढ लागू करणे.19) 30 जूनला सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना एक जुलैची वेतन वाढ लागू करणे.20)आंतरजिल्हा बदलीने गोंदिया जिल्ह्यात रोजी झालेल्या शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करणे२१) सालेकसा व तिरोडा येथिल शिक्षकांची वसुली थांबविणे

चर्चेदरम्यान माननीय मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे साहेब, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये साहेब ,लेखा अधिकारी बागडे साहेब, उपशिक्षणाधिकारी दिघोरे साहेब कक्ष आधीक्षक सौरभ अग्रवाल, सोबतच शिक्षक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… वरील मागणीच्या अनुषंगाने कार्यालयाकडून संघटनेला लेखी स्वरूपात उत्तर मिळाल्यानंतरच 17 जुलैला नियोजित धरणे आंदोलन मागे घेण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले*यावेळी *संदीप तिडके, किशोर डोंगरवार, संदिप मेश्राम, अशोक बीसेन, सुरेश रहांगडाले, राज कडव , उमेश रहांगडाले, राजू बोपचे, शोभेलाल ठाकुर, महिला जिल्हाध्यक्षा ममता येडे, भारती तिडके बाळू वालोदे, टी एम शहारे, गजानन पाटणकर, नोकलाल शरणागत, हिवरज पाऊलझगडे, नरेंद्र गौतम, सुनील भगत , उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *