सहकार मंत्री श्री अतूल सावे यांच्या सोबत सहकारी पतसंस्था विषयी चर्चा

शाहिद पटेल
गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया च्या वतीने सहकार मंत्री अतूल सावे यांना शिष्टमंडळ भेटून पतसंस्था ला भेडसावत असणाऱ्या आर्थिक नगदी व्यवहार ची मर्यादा वाढविणे , अनु . जाती /जमाती या निवडणुकीतिल प्रवर्गात स्वतंत्र पने अनु जमाती प्रवर्गासाठी नविन गट तयार करणे, पतसंस्था मध्ये सभासद हितार्थ घेण्यात येणाऱ्या निर्णयांना मंजुरी मिळवुन देणे,
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था निवडणुक वर जी स्थगीती देण्यात आली आहे त्याबद्दल सदर पतसंस्था पगारदार वर्गाची असल्याने व शेती संबंधी कामे नसल्याने स्थागिती आदेश मागे घेण्याबाबत निवेदन देवून चर्चा केली असता सर्व बाबीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळ ला दिले
चर्चा वेळी किशोर डोंगरवार अध्यक्ष गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया,श्री प्रकाश भाऊ बाळबुध्दे संस्थापक स्मार्ट विलेज डेव्हलपमेंट सोसायटी ,रमेश सिंगनजुडे अध्यक्ष अखिल भारतीय शिक्षक संघ भंडारा उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *