मुकुल आणि भार्गव झळकणार फ्रान्स च्या बॅस्टिल परेड मध्ये : उंचावणार गोंदिया जिल्ह्याच्या नाव

गोरेगांव जिल्ह्यातील हिराटोला गावातील मुकुल देवेंद्र बोपचे (२१ वर्ष) आणि खैरबोडी़ ता.तिरोडा गावातील भार्गव साहेबराव भगत (२१ वर्ष), हे २ शौर्यवीर १४ जुलै ला फ्रान्स ला होणाऱ्या बॅस्टिल परेड मध्ये झळकणार आहेत.14 जुलै हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात 1789 मध्ये याच दिवशी बॅस्टिलपासून या क्रांतीची ठिणगी पेटली होती. यावर्षी ‘बॅस्टिल डे’ च्या *कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी* यांच्या सन्माननीय उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे.विशेष बाब म्हणजे भारतीय नौदलाच्या तुकडीत आपल्या विदर्भातील 2 शौर्यवीर झळकणार आहे आणि पहिल्यांदाच आपल्या गोंदिया जिल्ह्यातून बेस्टाइल परेड साठी कुणाची तरी निवड झाली आहे,हि खूप अभिमानास्पद बाब आहे .पून्हा एकदा विदर्भा चा , गोंदिया जिल्ह्याचा नाव ऊँचावणार आहेत.*उल्लेखनीय म्हणजे मुकुल देवेंद्र बोपचे मागील सलग दोन वर्षांपासुन २६ जनवरी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली राजपथावरील परेडचे अनुभवी आणि हिस्सेदार राहिलेले आहेत.* मुकुल आणि भार्गव अवघ्या वयाच्या १९ वर्षात भारतीय नौसैनात रुजू झाले.मुकुल आणि भार्गव यांनी जागतिक स्तरावर आपल्या देशाचे , राज्याचे आणि विशेष म्हणजे आपल्या गोंदिया जिल्ह्याचे नाव उंचावला आहे. जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक आणि प्रशंसा होत आहे . संपूर्ण गोंदिया जिल्हा परेडची आतुरतेने वाट बघत आहे . मुकुल आणि भार्गव यांनी ह्या सर्व यशाचे श्रेय आपल्या संपूर्ण कुटुंबाला , प्रशिक्षकांना दिले. त्यांच्या नातेवाईकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये , मित्रमंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *