नाबार्ड अंतर्गत फार्मर प्रोड्यूसर संचालक क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड अंतर्गत श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदीया यांचे वतीने दिनांक 04 जुलै 2023 ते 06 जुलै 2023 ह्या कालावधीत तुलसी आय. टी. आय. किडंगीपार रोड आमगाव चे सभागृहात फार्मर प्रोड्यूसर कंपणीतील डायरेक्टर यांचे तिन दिवशीय, निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.


सदरच्या कार्यक्रमात उद्घाटनीय स्थान मा. अविनाश लाड डि.डि.एम नाबार्ड गोंदिया, व अध्यक्ष डॉ. सय्यद अली वरीष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र गोंदिया व प्रमुख मार्ग-दर्शक मा. विजय बाहेकर सचिव श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया, मा. डॉ. कांतीलाल पटले पशुविकास अधिकारी गोंदीया, मा. डॉ. शैलेद्र पटेल पशु- विकास अधिकारी गोंदीया, मा. सुशिल वाढई रिजनल मैनेजर HDFC बैंक, गोंदीया, मा. संजय बाहेकर सामाजिक कार्यकर्ता आमगाव, मा. भोगेश्वर चिरवतकर सहाय्यक अधिकारी मत्स्यव्यवसाय विभाग गोंदिया यांचे प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली. मा. अविनाश लाड डि.डि.एम नाबार्ड गोंदिया यांनी नाबार्डची संकल्पना व फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे महत्त्व काय व कंपनीच्या माध्यमातून विकास कामाचे धोरण या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मा. डॉ. सय्यद अली, वरीष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र गोंदीया यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीने व्यवसाय निवड करीत असतांना निवडीचे निकस व त्यांची अंमल बजावणी व उत्पादन निर्यात आणि मुल्य साखळीचे महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. मा. विजय बाहेकर सचिव श्री गणेश ग्रामीण विकस शिक्षण संस्था गोंदिया यांनी गोंदिया जिल्हाची भौगोलीक परीस्थीती, मत्स्यव्यवसाय व दुग्ध व्यवसाय यांचे महत्त्व, शेयर धारक यांचे विश्वास संपादन, तसेच महाराष्ट्रातील यशस्वी कंपनीचा अनुभव, संचालकाचे महत्त्व ‘हया विषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. व इतर मार्गदर्शकांनी संचालक कृषि संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मुकेश बिसेन शास्त्रज्ञ श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया यांनी केले. तर आभार प्रदर्शन गजानन अलोने कार्यक्रम समन्वयक ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया यांनी केले. या कार्यक्रमात जलधन फार्मर प्रोड्यूस कंपनी गोंदिया, विदर्भ मत्स्य उत्पादक फार्मर प्रोड्यूसर उत्पादक कंपनी अर्जुनी मोरगाव, भवभूति मिल्क प्रोड्यूसर कंपनी आमगाव यातील संचालक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता छत्रपाल धुवारे कार्यालयीन कार्यकर्ते यानी अथक परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *