स्कूल चले हम: पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सुरेन्द्रकुमार ठवरे

अर्जुनी मोरगाँव :-श्रीमती केशरबाई शिक्षण संस्थाद्वारा संचालित सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जी. एम. बी. हायस्कूल अर्जुनी मोर येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव दीन चैतन्यमय, आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेतर्फे मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी, भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. फुगे, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते.

वर्गखोल्याही आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेली शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या आकाराची, रंगाची दप्तरे घेतलेली, आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली तर काही हिरमुसलेल्या चेहर्‍याने गप्प उभी असलेली मुले शाळेत दिसून आली. तर काही कुतूहलाने बघत असलेली, हसत, खेळत असलेली मुले, रडणार्‍या मुलांना समजावत असलेले शिक्षक असे दृश्य शाळेच्या पहिल्या दिवशी बघायला मिळाले.विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. शैव्या जैन, पर्यवेक्षक श्री लुटे सर , ज्ञानेश्वर रोकडे सर, किशोर सोनटक्के सर, क्रीडा शिक्षक शेळके सर यांच्यासह सांस्कृतिक समितीतील सदस्य सर्व शिक्षक वृंद पालक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *