जेष्ठ कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचे आधारस्तम्भ -केशवराव मानकर

मोदी सरकारने नऊ वर्षाच्या कार्यकाळात जे कार्यकर्त्यांच्या मेहनीतिने भारतीय जनता पक्षाला ही उँची गाठन्यासाठी  योग्य पाऊल टाकलेत  व पक्षाला बळकटी आणली  ती अनमोल आहे,  जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गोंदिया जिल्हा अध्यक्ष माजी आमदार केशवराव मानकर यांनी मनोगत व्यक्त केले. देशातील जनतेच्या सबका साथ सबका विकास,  या विचार धारेने प्रेरित  केंद्र सरकारच्या 9 वर्षीय कार्यकाळात उद्योगपती,शेतकरी,शेतमजूर, शिक्षण,आरोग्यापासून तर सर्व सामान्यांचा विकास साधून आर्थिक स्थर उंचावण्याच्या यशस्वी प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा बहुमान वाढला.सर्व जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे.यासोबतच सरकारने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान आवास योजना,उज्वला योजना,किसान सन्मान योजनेत वर्षाचे सहा हजार रुपये,गरिबांना मोफत अन्नधान्य,कोरोना काळात मोफत लसीकरण,गोधरी मुक्तीसाठी शौचालय, आयुष्यमान भारत अंतर्गत सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत पाच लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत,शेतमालाचे समर्थन मूल्य वाढवून शेतकऱ्यांना मदत अशा शेकडो जनकल्याणकारी योजना राबवून मोदी सरकार सर्वच क्षेत्रात विश्वास पात्र ठरली आहे.मात्र विरोधकांना मोदी सरकारचे यश पाहवत नाही.आगामी निवडणुकित मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्ष एकत्र झाले. विरोधकांकडे कुठलेही ठोस मुद्दे नाहीत.भारताचा कल्याण आणि विश्वगुरू बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपा म्हणजे आपली शेती हा ध्यास उरी धरून भाजपचे सरकार अखंड ठेवन्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी पुढे बोलताना केले
   फार्मसी कॉलेज सभागृह आमगाव येथे आयोजित सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण मोदी@९ अंतर्गत जेष्ठ नागरिक सत्कार मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून संबोधन करीत होते. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार बाळा भाऊ काशिवार, भेरसींग नागपुरे, प्रदेश सचिव संजय पुराम, माजी जीप अध्यक्ष विजय शिवनकर, संगठन महामंत्री विरेंद्र अजनकर, बाल कल्याण सभापती सविता ताई पूराम,जिला उपाध्यक्ष अँड येशुलाल उपराडे, जिला सचिव सरोज कोसरकर, पस सभापती राजेंद्र गौतम, जीप सदस्य हनवत वटी, किशोर महारवाडे, महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राजु पटले, राकेश शेंडे, नगर अध्यक्ष पिंटू अग्रवाल, महिला आघाडी अध्यक्ष सुषमा भूजाडे, निमेश हमाहे, रघुनाथ भूते, मनोज सोमवंशी व जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
 यावेळी, बाळा काशिवार, भेरसींग नागपुरे, संजय पुराम, विजय शिवनकर यांनी मार्गदर्शन केले ,कार्यक्रमाचे संचालन राजु पटले यांनी तर आभार मनोज सोमवंशी यांनी मानले।।

माजी वित्त मंत्री महादेवराव शिवनकर जेष्ठ नागरिक म्हणून त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला,
।तसेच शशि रामचंद शेंडे चा ही सत्कार करण्यात आला।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *