कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू ,एक गंभीर जखमी…..कार ने दुचाकी वाहणास मागून दिली धडक…..

आपल्या आईच्या भेटी करिता आली होती महिला गावी….

आमगाँव –
गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास पासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. त्याच सुमारास रात्री दहा वाजे च्या दरम्यान नागेश उईके वय 30 वर्ष माडीटोला ,अंजोरा आणि अनिता राजू वरमाडे वय 32 वर्ष रामाटोला अंजोरा हे दुचाकीने आमगाव वरून गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीस एमएच 35 एटी 1340 या दुचाकीस चार चाकी वाहन मारुती सुझुकी सियाज एमएच 35 पी 6960 या चारचाकी वाहनाने मागून मोटरसायकल धडक दिली या धडकेमध्ये अनिता वरमाडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर नागेश उईके हा गंभीर जखमी झाला धडक केवढी जोरदार होती की महिला वीस ते पंचवीस फुटापर्यंत फेकल्या गेली. या अपघातानंतर चारचाकी वाहन चालक हा अपघताच्या जागेवरून वाहन तिथ सोडून प्रसार झाला. अनिता ही पुण्यावरून आपल्या आईच्या भेटी करिता आली होती मात्र आपल्या आईची भेट करू शकली नाही तिच्यामागे दोन लहान बालके असून ते सुद्धा पुणे या ठिकाणीच राहतात या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून .अनिताच्या मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *