विषारी सापाला दिले जीवनदान

दिनांक २५ जून ला* दुपारी ३.००च्या दरम्यान बनगाव येथे राहणारे चंदनसिंग परिहार यांच्या घरातील अंगणामध्ये दगडात धामण जातीचा विषारी साप दडुन असल्याचे, भरत चुटे यांनी गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते यांना कळविले तसेच लवकरात लवकर येऊन त्यांला पकडण्याची विनंती केली असता, गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते गोदिया जिला वनअधिकारी श्री.प्रदीप पाटिल*, तथा आमगाँवचे आरएफओ श्री. रवि भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, घटनास्थळी पोहोचले आणि धोका पत्करून दगडांच्या आड लपलेल्या धामण सापाला पकडले,व नंतर पकडलेल्या विषारी धामण सापाला जीवनदान देत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.सापाला पकडण्यादरम्यान दिनेश थेर ,सुनील नागपुरे आणि घटनास्थळी उपस्थीत गावकरी मंडळीनी भरपुर मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *