समाजशील शि‌क्षक अनिल मेश्राम दांपत्याचा पुढाकारसमाजातील दानशूर व्यक्तींनी उचलला खारीचा वाटाअनाथ मुले,एकल महिलांना अन्नधान्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

सडक अर्जुनी
ऐन खेळण्याबागडण्याच्या वयात जन्म दात्यांचे छत्र हिरावून अनाथ निरागस बालक तसेच कोरोना एकल महीलांना मदतीचा हात पुढे करून पालकत्वाची जोड देण्यात सौंदड निवासी सेवानिवृत्त समाजशील शि‌क्षक अनिल मेश्राम व त्यांच्या सुविद्य पत्नी निलिमा सतत धडपड करत असतात.त्या निरागस अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, वात्सल्य युक्त प्रेमाची थाप देऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे व्रत अंगिकारणारे अनिल मेश्राम यांच्या पुढाकाराने तसेच तलाठी भगवान नंदागवळी व मधुसूदन दोनोडे यांच्या सहकार्याने सौंदड येथील मेश्राम यांच्या निवासस्थानी अनाथ मुले व एकल महिला यांचा मनोमिलन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम बुधवारी (दि २१ जून) आयोजित केला होता.यावेळी तांदूळ डाळ तेल जीवनावश्यक वस्तूंसह एकल महिलांना साडी चोळी,अनाथ बालकांना शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, कंपास बॉक्स वाटप करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन मदतीची ग्वाही दिली.
जिल्ह्यातील अनाथ मुले तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील कोरोना एकल महिलांना सदोदीत पालकत्वाची जोड देऊन मदतीसाठी सदैव तत्पर असणारे समाजशील शि‌क्षक अनिल मेश्राम मागील सहा वर्षांपासून आपल्या सौंदड निवासी २१ जून जन्मदात्यांची सावली हरविलेल्या अनाथ मुलांचा व कोरोना एकल महिलांचा मागिल तीन वर्षांपासून मनोमिलनाचा कार्यक्रम दरवर्षी घेतात.
सदर कार्यक्रमाचे प्रत्येक्षात साक्षीदार होण्यासाठी ,त्यांना पालकत्वाची जोड देण्यासाठी माजी आमदार दिलीप बनसोड, सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे, अनाथांची माय प्रा डॉ सविताताई बेदरकर, लो शि संस्था संस्थापक अध्यक्ष जगदीश लोहिया, उपसरपंच भाऊराव यावलकर, अल्लाउद्दीन राजानी , डॉ लता लांजेवार नवेगावबांध, प्रदिप शहारे, दामोदर नेवारे,सुखदास मेश्राम, मधुसूदन दोनोडे संस्थापक, तलाठी भगवान नंदागवळी, सेवानिवृत्त शिक्षक आर व्ही मेश्राम, दिलीप राऊत,समीम अहमद सैय्यद,अमरचंद ठवरे, अनिल मेश्राम, निलिमा मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून आलेले अनाथ मुले,एकल महिला यांचेशी हितगुज साधतांना मान्यवरांनी समाजशील शि‌क्षक अनिल मेश्राम, निलिमा मेश्राम दाम्पत्याच्या सामाजिक कार्याची मोठ्या मनाने प्रशंसा केली.
जन्मदात्यांचे छत्र हरविलेल्या अनाथ बालकांना तसेच एकल महिलांना उभे आयुष्य जगताना आपलीही एक सामाजिक बांधिलकी समजून प्रत्येकांनी खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे यावे.निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सामाजिक जान ठेवून मदतीचा हात पुढे करावा.त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सर्वोतोपरी मदत करने ही ईश्वरीय सेवा समजून समाजातील हितचिंतकांनी अनाथांना आधार म्हणून साथ देण्यासाठी पुढे यावे हीच समाजसेवा असल्याचे सांगून अनाथ बालकांनी आणि एकल महिलांनी खंबीरपणे जीवन जगावे, आम्ही सोबत आहोत अशी ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते तथा वार्ताहर अमरचंद ठवरे यांनी केले, प्रास्ताविक डॉ सविताताई बेदरकर जेष्ठ समाजसेविका यांनी केले. उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक सेवानिवृत्त शिक्षक अनिल मेश्राम, निलिमा मेश्राम या दाम्पत्यानी केले.

एकल महिलांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

इयत्ता दहावी बारावी परीक्षेत एकल महिलांचे पाल्य चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात जिद्द चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामगीता, शैक्षणिक साहित्य,रोख राशी भेटीसह मान्यवरांचे हस्ते गुलाब पुष्प पेन देऊन गौरविण्यात आले.

या दानदात्यांनी उचलला खारीचा वाटा

अनाथ मुले आणि एकल महिला यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी या सामाजिक योगदानात उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, दिवाणी न्यायाधीश डाॅ विक्रम अं आव्हाड , जगदीश लोहिया, दिलीप बनसोड,आनंद अग्रवाल, श्रीमती चंदाबाई खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्ट,प्रसेनजीत रामटेके,आर व्ही मेश्राम से नी शिक्षक, भाऊराव यावलकर , डॉ लता लांजेवार , प्रकाश काशिवार, ॲड संजय हटकर, तहसीलदार शरद कांबळे,प्रमोद बांबोळे, (एपीआय) अमीत कांबळे, नवलकिशोर अग्रवाल, मधुसूदन दोनोडे,सुखदास मेश्राम, दामोदर नेवारे,सत्यजित राऊत,व्ही बी राठोड ,एल एम पातोडे, सुनिल भिमटे, डॉ दिनेश ब्राह्मणकर, दिलीप राऊत, संदिप मोदी, अल्लाउद्दीन राजानी,दिपक गहाने, पुरुषोत्तम पातोडे , प्रकाश वैद्य तलाठी, वासुदेव परशुरामकर, अमोल वैद्य, ललित डोंगरवार,इंजी निमजे,शामा मेंढे, भगवान नंदागवळी, अनिल मेश्राम इत्यादींनी खारीचा वाटा उचलून हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *