रामराज्य आणण्यासाठी कायम पाठीशी राहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

भंडारा: सुशासन व विकास हे आमचे मिशन आहे. तर अंत्योदय हे आमचे उद्दिष्ट. काँग्रेस सरकारच्या 60 वर्षाच्या काळात जेवढी कामे झाली नाही तेवढी आम्ही 9 वर्षात केली. देशाचे भविष्य बदलायचा असेल, रामराज्य आणायचं असेल तर आमच्या प्रयत्नांच्या पाठीशी तुमचे खंबीर आशीर्वाद असू द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाजन संपर्क अभियानाच्या निमित्ताने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून आणि भाजपाचे दिवंगत माजी आमदार रामचंद्र अवसरे यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मा.उपेन्द्रजी कोठेकर, जि.प. अध्यक्ष मा. पंकज रहांगडाले, आ. विजय रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपूंजे, डॉ. परिणय फूके, माजी मंत्री राजकुमार बडोले, संजय पूराम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तारीक कुरेशी, गोपाल अग्रवाल, हेमकृष्ण कापगते, प्रदीप पडोळे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भेरसिंग नागपुरे, प्रकाश बाळबुधे, बाळा अंजनकर, वसंता एचिलवार, प्रशांत खोब्रागडे, रेखा भाजीपाले, नेपाल रंगारी, विलास काटेखाये, विनोद बांते, चैतन्य उमाळकर, डॉ. उल्हास फडके, राजेंद्र पटले, नेपाल रंगारी, ओम कटरे, संजय कुलकर्णी, संजय टेंभरे, सौ.भावना कदम, सौ.इंद्रायणी कापगते यांच्यासह भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक भाषणात खा. सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.मा

गील 9 वर्षाच्या काळात देश सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरला आहे. आरोग्य, शिक्षा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्र ढवळून निघालं आहे. ही विकासाची गंगा भंडारा गोंदिया जिल्ह्यात प्रवाहित झाली आहे. रस्ते विकास असो का लोककल्याण आज जिल्हा प्रगतीच्या दिशेने जात आहे. नितीनजी गडकरी यांनी जिल्ह्याला बरेच काही दिले. जनधन, घरकुल, आरोग्य विमा, किसान सन्मान योजना अशा सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यात लाखो नागरिकांना मिळाला आहे. नागपूर ते भंडारा मार्ग 6 पदरी करावा, तुमसर बालाघाट रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे व गोंदिया येथे लॉजिस्टिक पार्क चा विषय मार्गी लावून विकासात भर घालावी, अशी मागणी यावेळी खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केले. सभेला संबोधित करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सध्या देशात मतांच्या, राजकारणाच्या आड वीरांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकात काँग्रसचे सरकार आले आणि त्यांनी अभ्यासातून विर सावरकरांचे पुस्तक रद्द करण्यात आले. धर्मांतरण विरोधी कायदा, गोहत्याबंदी कायदा रद्द करण्याचे काम केले जात आहे. हा प्रकार प्रचंड संतापजनक आहे. भाजपा केवळ विकासाचे राजकारण करते म्हणून आज देश बदलत आहे. हा बदल नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आहे. जे कार्य 9 वर्षात मोदी सरकार ने केले, त्याचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न केवळ मतदारांचे आभार मांडण्यासाठी असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.सभेत पुढे बोलताना गडकरी म्हणाले, अडी अडचणीच्या काळात जे कार्यकर्ते झटले, ज्यांनी समर्पण केले, त्याला विसरून चालता येणार नाही. जुन्या इतिहासातून नेहमी शिकले पाहिजे. मागच्या 60 वर्षात काँग्रेसने गरिबी हटविण्याचा केवळ कांगावा केला. आम्ही ते करून दाखविले. अंत्योदयाच स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. गरीब, दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करण्याचा घेतलेला वसा अविरत जपला जाईल, असेही ते म्हणाले. सिंचन, शिक्षणातून समृध्दी साधत आज देश विश्र्वगुरू होऊ पहात आहे. हे सर्व जनता जनार्दनाच्या आशीर्वाद चे फलित असल्याचे ते म्हणाले. आज देशात दिसणारा बदल आणि होत असलेले परिवर्तन आमच्या कार्याची पावती असून आपण असेच आमच्या पाठीशी कायम उभे राहा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.सभेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. संचालन माजी आमदार बाळा काशीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *