म.पो.वॉ. संघटनेचे अध्यक्ष आसुतोष यांचा विदर्भ दौरा

विदर्भातील पोलीस परिवारांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी विदर्भातील पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेटी देऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आसुतोष चौव्हान गौरव सपकाळ अकोला यांनी उपविभागीय अधिकारी विजय भिसे, पोलीस निरिक्षक युवराज हांडे आमगाव ला भेट देऊन कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांचे विविध समस्या विषयी सांगोपांग चर्चा करून पोलीसांच्या निवास व आरोग्य विषयी उद्भवणान्या समस्या जाणून घेऊन महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारासाठी संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले नेहमीच तत्पर असल्याचे आसुतोष चौव्हान यांनी सांगितले.

याप्रसंगी देवरी, सालेकसा, आमगाव, गोंदिया येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करून संघटनेला बळकट करण्याचे आवाहन गौरव सपकाळ जिल्हा उपाध्यक्ष अकोला यांनी केले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जयश्री पुंडकर यांनी तालुकास्तरावर संघटनेचे कार्य विषद करून संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या नेतृत्वात विदर्भात आणखी जोमाने कार्य करून संघटना मोठी करू असे याप्रसंगी सांगितले..या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षा जयश्री पुंडकर, रोहीणी ठाकरे, वंदना बैस, शोभा डोये, उमादेवी बिसेन, लक्ष्मी येळे, ओमप्रकाश पारधी, विनोद कावळे, सुजीत अग्रवाल ता. अध्यक्ष देवरी, सचिन भांडारकर, अरुन आचले, अविनाश विझलेकर, बाळकृष्ण राऊत उपस्थित होते.ओमप्रकाश पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *