24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा आमगांव तालुका राकापा

आमगांव तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने आज दि.10/06/2023 ला पक्ष कार्यालयात पक्षाचा 24 वा वर्धापन दिवस ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला. श्री सुरेश हर्षे जि.प.सदस्य व गटनेता यांचे अध्यक्षतेखाली श्री कमलबापू बहेकार तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी सुरेश हर्षे यांनी पक्षाची स्थापणा व मा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे योगदान व भूमिका विशद केली तर कमलबापू बहेकार यांनी पक्ष संघटन व बूथ कमेटी मजबूत करण्यासंबधी तसेच नविन बूथ कमेटी लवकरात लवकर तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार ताराचंद नामुलते यांनी केले. यावेळी प्रामुख्याने सर्वश्री सुरेश हर्षे,कमलबापू बहेकार, अँड. सीमाताई शेंडे, जियालाल पंधरे, कविताताई रहांगडाले, रविंद्र मेश्राम, चुन्नीलाल शहारे,अनिल शर्मा,विनोद कन्नमवार, जयश्रीताई पुंडकर, संगीताताई ब्राम्हणकर, तुकडोजी रहांगडाले, सुनिल ब्राम्हणकर, एम.पी.तुरकर, तुलेंद्र कटरे, ताराचंद नामुलते राजकुमार प्रतापगडे, सुमित कन्नमवार, संतोष रहांगडाले, गिरीश पटले,उमेश बिसेन, बाबुराव ब्राम्हणकर, सौरभ डोंगरे, फत्तुजी गाते, संजय लाडे, बी.वाय.ताजने, पी.बी.भक्तवर्ती, आर.एस.वैष्णव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *