भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाची सुरवात आज

मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री अरविंदसिंह भदोरिया अर्जुनी मोरगावात…

अर्जुनी मोरगाव,

मोदी@९ या महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात आज (शनिवार) पासून अर्जुनी मोरगाव येथून होत आहे.या अभियानाचे भंडारा-गोंदिया,गडचिरोली,वर्धा आणि नागपूर या चार लोकसभा क्षेत्राचे अभियान प्रमुख मध्यप्रदेशचे सहकारिता तथा लोकसेवा प्रबंधन कॅबिनेट मंत्री अरविंदसिंह भदोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रसन्न सभागृहात दुपारी १२ बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला लोकसभा क्षेत्रातील अभियान समिती प्रमुख उपस्थित असतील.मंत्री भदोरिया सर्व समिती प्रमुखांची अभियान संदर्भात चर्चा करून नियोजन सांगतील.सायंकाळी ६ वाजता व्यापारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित व्यापारी वर्गाशी भदोरिया संवाद साधतील. सकाळी 11 वाजता भदोरीया यांचे आगमन लाखांदूर येथे होईल.खासदार सुनील मेंढे त्यांचे स्वागत करून अर्जुनी ला कार्यक्रम स्थळी घेऊन येतील. दिवसभर चालणाऱ्या या महा संपर्क अभियान कार्यक्रम प्रसंगी सर्व अभियान समिती प्रमुख आणि व्यापारी बंधुनी हजर होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *