तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता ‘ पुरस्कारासाठी निवड.

सडक अर्जुनी.
रत्नदीप विद्यालय चिखली येथील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता ‘ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये झालेया इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रावीण्यासह प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये प्रथम प्रशांत केशोराव देवरे, व्दितीय मयूर रवींद्र ठलाल, तृतीय तुषार खेमराज
राऊत या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यालयात पुढील होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त शिक्षक तथा नीलकमल स्मृती फाउंडेशनचे आयोजक आर.व्ही.मेश्राम यांच्या वतीने सदर विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर.व्ही.मेश्राम, आयोजिका प्रज्ञा मेश्राम, मुख्याध्यापक एल.एम. पातोडे, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन, कौतूक केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे सेवानिवृत शिक्षक आर.व्ही.मेश्राम यांच्या मुलाच्या स्मृती प्रीत्यर्थ नीलकमल स्मृती गुणवत्ता पुरस्कार २००४ पासून देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *