आरंभ फाउंडेशनच्या वतीने ‘प्रमानंद रंगारी प्रेरक ‘ पुरस्कार घोषित.

शाहिद पटेल

सडक अर्जुनी. पळसगाव/राका येथील आरंभ फाउंडेशन इंडीयाच्या वतीने चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्कार घोषित करण्यात आला. मार्च २०२३ मध्ये झालेल्या माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ( इयत्ता दहावी) विद्यालयातून प्रावीण्यासह प्रशांत केशोराव देवरे याने प्रथम,मयुर रवींद्र ठलालयाने द्वितीय व तुषार खेमराज राऊत या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला.सदर गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयात पुढील होणाऱ्या शालेय कार्यक्रमामध्ये आरंभ फाउंडेशन इंडीयाचे संस्थापक/ अध्यक्ष प्रमानंद रंगारी यांचे कडून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार घोषित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे आरंभ फाउंडेशन इंडियाचे संस्थापक/अध्यक्ष प्रमानंद रंगारी, मुख्याध्यापक एल.एम. पातोडे, पदाधिकारी,प्रकल्प समन्वयक,शिक्षक व कर्मचारी यांनीअभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *