भंडारा – गोंदिया लोकसभा निवडणूक प्रमुख पदी विजय शिवणकर यांची नियुक्ती

आनन्द शर्मा आमगाँव : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राज्यात आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्यावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या द्र्ष्टीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय शिवणकर हे एक वेळा गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तर दोन वेळा उपाध्यक्ष राहिले आहेत. विजय शिवणकर हे राज्याचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे सुपुत्र असून जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपर्यंतचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. संघटनेचा दांडगा अनुभव त्यांना असून ते भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याचे महासचिव सुद्धा राहिले आहेत. दरम्यान प्रतिक्रिया देताना विजय महादेवराव शिवणकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नद्डा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सहज विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक प्रमुख पदाची अत्यंत महत्वाची जवाबदारी दिल्याबद्दल विजय महादेवराव शिवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विदर्भ विभाग संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी पालकमंत्री परिणय फुके आणि भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *