श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांचे सुयश

भवभूती शिक्षण संस्था आमगाव, द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या बी. फार्म (द्वितीय वर्ष) चा निकाल नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणारे, जि. रायगड द्वारे प्रसिद्ध झाला.महाविद्यालयाच्या निकाल समाधानकारक असून चि. अभय जगणे यांना प्रथम क्रमांक पटकावले तसेच कु. साक्षी बिसेन व कु. टिंकल रोकडे यांनी क्रमशः द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.के संघी व संस्थेचे संस्थापक श्री केशवरावजी मानकर तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *