मोदी सरकारचे 9 वर्ष विकासाला समर्पित

जितू पटले

आमगाव येथे माजी आमदार भेरसींग नागपुरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नागरिकांचे जीवनमान सुधारणे, शेवटच्या घटकापर्यंत घटकापर्यंत विकास पोहोचविणे व राष्ट्रविकासासाठी गेल्या 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे मत भाजपचे माजी आमदार भेरसींग नागपुरे यांनी आदर्श विद्यालय आमगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.बालासोर येथे रेलवे अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ७ जून रोजी भाजपतर्फे आमगाव येथील आदर्श विद्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत भाजपचे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे,प्रदेश सचिव माजी आमदार संजय पुराम, माजी ,जीप सदस्य हनवत वटी, किशोर महारवाडे,पस उपसभापती नोहरलाल चौधरी पण सदस्य सुनंदा उके, तालुकाध्यक्ष काशीराम हुकरे, महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राजु पटले, राकेश शेंडे, उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, आज राष्ट्रसेवेला 9 वर्षे पूर्ण करत असताना नम्रतेने आणि कृतज्ञतेने भाजप ओतप्रोत आहे. घेतलेला प्रत्येक निर्णय,प्रत्येक कृती, लोकांचे जीवन सुधारण्याच्या इच्छेने केले आहे.विकसित भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर परिश्रम करत राहू, असे म्हटले आहे. गेल्या 9 वर्षांत भारतातील गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, उज्वला योजना, हर घर नल योजना, आयुष्यमान आरोग्य योजना, गरीब कल्याण योजना, जनधन योजना, मुद्रा योजना, पीक विमा सारख्या मूलभूत गरजेच्या योजना व उपक्रम राबवले आहे. लाखो लोकांचे जीवनमान उंचावणे व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय असून मोदी सरकारचे 9 वर्ष सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाचे युग आहे, असे म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आत्मनिर्भरता, जगात भारताचे स्थान, आर्थिक सक्षमीकरण व विविध क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेऊन सरकारने अनेक युगप्रवर्तक निर्णयाद्वारे भारताच्या भविष्याला नवी दिशा दिली आहे. आज ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसीत भारताचा संकल्प घेऊन देश पूर्ण आत्मविश्वासाने आणि उत्साहाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीतून जगातील अनेक विकसित देश आजही बाहेर पडू शकलेले नाहीत. मात्र, भारत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे असे नमूद केले. आभार महामंत्री नरेंद्र वाजपेयी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *