आर जे लोहिया विद्यालयातील विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेतील सुयश सेमी इंग्रजीचा निकाल १००टक्के

सौंदड : – येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनदास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथून एस.एस.सी.मार्च – २०२३ परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यांपैकी १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९८.६१आहे. यात विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत ९३विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००टक्के आहे.या माध्यमाचे एकूण १९विद्यार्थांनी ९० टक्केच्या वर गुण प्राप्त केले आहेत.यात धिरज भिवगडे याने ९६.६० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक,कु. माधवी विठ्ठले हिने ९५.८० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक, कू.हेमलता मस्के हिने ९४.४०टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक, निकेश कुरसुंगे९३.८०टक्के गुण घेऊन चतुर्थ क्रमांक तर कू.रोहीनी बघेल ९3.४०टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकावला आहे. दरवर्षी प्रमाणे विद्यार्थांनी शाळेच्या निकालाचा उच्चांक कायम ठेवला आहे. सर्व प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थांचे .जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था , सौंदड यांच्या शुभहस्ते ९०% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पेन व पुषगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल, मा. गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे,पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, प्राध्यापक आर . एन. अग्रवाल तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी यशाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व गुरूजनांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *