क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द:- लायकराम भेंडारकर

बोंडगाव देवी जि.प.क्षेत्रात विविध कामांचे भूमिपूजन

अर्जुनी मोर. :- बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्र हा धार्मिक विविधतेने नटलेला आहे. या क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक, व शैक्षणिक वातावरण टिकविण्यासोबत क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन बोंडगाव देवी क्षेत्राचे जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले. बोंडगाव देवी जि.प.क्षेत्रात येणा-या चान्ना बाकटी व बोंडगाव देवी येथे आयोजित विविध विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी भेंडारकर बोलत होते. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना/ बाकटी येथे कर्मचारी वसाहतीकडे जाणा-या रस्ता बांधकामासाठी चार लक्ष रुपयांचा निधी जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे वतीने मंजुर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन गोंदिया जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणविर यांचे हस्ते,जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला.यावेळी सरपंच सचिन डोंगरे,उपसरपंच मोरेश्वर सोनवाने, वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्वेता कुलकर्णी, डाॅ.सुरेंद्र खोब्रागडे, डाॅ. कुंदन कुलसुंगे,प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद हायस्कुल बोंडगाव देवी येथे आठ लाखाचे शौचालय बांधकाम मंजूर करण्यात आले. त्याचेही भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणविर यांचे हस्ते जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी सरपंच प्रतिभा बोरकर,सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष पतीराम मेश्राम, संजय गि-हपुंजे,रवि बनपुरकर,व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *