पद असोत वा नसोत जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी सदैव तत्पर:–माजी मंत्री राजकुमार बडोले

अर्जुनी मोरगाव – तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात आहोत. भाजपाने संधी दिली आमदार झालो .कॅबिनेट मंत्री झालो त्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेचा मी सदैव ऋणी आहे. आपल्या आमदार किंवा मंत्रीपदाच्या काळात आपण जनतेला न्याय देण्याचे काम केले. सोबतच या विधानसभा क्षेत्रात कोट्यावधीच्या निधी आणून सर्वांगीण विकास केला. मंत्री म्हणून सामाजिक न्याय विभाग काय असते हे महाराष्ट्राला दाखवून दिले. मी ज्या खात्याचा मंत्री होतो त्या माध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आता पद असो वा नसो जनतेच्या सेवेसाठी व या विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे मत माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. अर्जुनी मोर तालुक्यातील ईटखेडा, महागाव जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मंजूर असलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी( ता.3) राजकुमार बडोले बोलत होते. कोरंबी टोला येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी या विभागाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते. सर्वप्रथम ईटखेडा व बोरी येथे उन्हाळी हमीभाव धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. मांडोखाल येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा व पाईपलाईनचे भूमिपूजन करण्यात आले. आसोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मंजूर असलेल्या आवारभिंत बांधकामाचे भूमिपूजन, अरुणनगर व गौरनगर येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन अशा विविध विकास कामाचे भूमिपूजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राजकुमार बडोले म्हणाले की जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतून हर घर नल, हर घर पाणी ही महत्त्वाकांक्षी योजना देशातील प्रत्येक गावात राबविण्यात येत आहे. शेवटच्या स्तरातील नागरिकांना सुद्ध पिण्याचे पाणी मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे हा त्या मागचा उद्देश असून मोठ्या वेगाने ही कामे सुरू असल्याचे बडोले यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, माजी सभापती उमाकांत ढेंगे, तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोहाडकर, जेष्ठ कार्यकर्ते मुरलीधर ठाकरे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर नाजूक कुंभरे, प्रमोद लांडगे तथा लोकपाल गहाणे, सरपंच यशोदा नाकाडे, उपसरपंच भगवान नाकाडे सरपंच विकास वैद्य, सरपंच मधुकर ठाकरे व विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *