कट्टीपार येथे तीन गोठे जळून खाक चार लाखाचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

राधाकिसन चुटे

आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथील तीन शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे शेती विषयक साहित्य व धान्य पूर्णतः जळून खाक झाले असून त्यामध्ये चार लाख रुपयाचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे

कट्टीपार येथील शेतकरी जागदेव दशरथ राऊत, येवल कुमार दशरथ राऊत, योगराज गोपालराव व आनंदाबाई गोपालसाव 400 तनसीचे चे वेट, 10 पोती बिजाई चे धान व 30 पोती रब्बीचे धान तसेच शेतीला लागणारे नागर, पंखे व इतर साहित्य पूर्णतः जळून खात झाले असून यामध्ये शेतकऱ्यांचे 4 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे

तरी शासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे या घटनास्थळाला जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, पंचायत समिती सदस्या सरिताताई हरिणखेडे, सरपंच सविताताई चुटे, उपसरपंच महेंद्र फरकुंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश हरीणखेडे, पोलीस पाटील सरिता मेंढे, यांनी भेट देऊन शासनाने शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे यावेळी मंडळ अधिकारी आर आय बारसे, तलाठी मिर्झा मॅडम यांनी घटनास्थळाचे पंचनामा करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही मदत मिळेल ते देण्याच्या आश्वासन दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *