पंचशील विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

जयंत शिक्षण संस्था आमगाव रेल्वे द्वारा संचालित पंचशील हायस्कूल मक्काटोला ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा एकूण निकाल 97.10टक्के लागला.*प्रथम- कु.मानसी महेश भुते, 409(81.80%)द्वितीय- कु. कशीस देवेंद्र बडोले, 405(81.00% )तृतीय- कु. अस्मिता शामराव बहेकार,401( 80.20%)* *या सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे घरी जाऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.नंदेश्वर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यादवकांत हत्तीमारे, पालक शिक्षक संघाचे सदस्य महेश भुते,शिक्षक टी.के.चौधरी, एस. एस.पुंड,पी.एम.कोरे, आर.बी.सोनटक्के उपस्थित होते.

जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम,विद्यालयाचे प्राचार्य एस .पी.नंदेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्या करिता शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *