करमठ कार्यकर्ता भाजपाची ओळख-बडोले भाजपाची विस्तारित बैठक संपन्न

अर्जुनी मोरगाव, सच्चा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर देशासह भाजपा जगातली सर्वात मोठी राजकीय पार्टी म्हणून ओळखली जात आहे.महाराष्ट्रात जेव्हा भाजपचे कार्यकर्त नव्हते त्या काळात भंडारा जिल्ह्यात भाजपा मजबूत होती.अर्जुनी मोरगाव भाजपचा किल्ला म्हणून ओळखला जात होता.संवाद, संपर्क यामधून कार्यकर्ता मनातून जोडला जातो.जगात भाजपच्या डंका वाजत आहे. भाजपचा कार्यकर्ता नेहमी समोर असतो.कर्मठ,निष्ठावान या सच्चा कार्यकर्त्यामुळे भाजपा मजबूत झाली आहे. सच्चा कार्यकर्ता हीच भाजपची ओळख असल्याचे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते आज स्थानिक साई श्रद्धा लॉन्स येथे भाजपाच्या विस्तारित बैठकीचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करीत होते. यावेळी जि प सदस्य लायकराम भेंडारकर ,जि.प.सदस्या तथा भाजपा प्रदेश महीला मोर्चा महामंत्री रचनाताई गहाणे, पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, पं.स. सदस्य डॉ. नाजूक कुंभरे, शालिनी डोंगरवार,कुंदा लोगळे, प्रमोद लांडगे ,नगरसेविका ममता भैय्या,मुकेश जयस्वाल, रामदास कोहाडकर उपस्थित होते. बडोले पुढे म्हणाले, ही महत्त्वाची विस्तारित बैठक असताना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चिंतनाचा विषयी आहे.बैठकीला तालुका उपाध्यक्ष गैरहजर आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आपणच आपल्या पक्षातल्या उमेदवारांना पाडण्याची कामे केली.हे कृत्य बरोबर नाही.हा आत्मचिंतनाचा विषय आहे. सध्या पक्षामध्ये असलेले हेवेदावे विसरून सर्वांनी कामाला लागा.बूथ सक्षमीकरणासाठी बूथ प्रमुख आणि विस्तारकांनी एकजुटीने जबाबदारी पार पाडावी. असा सूचक टोला यावेळी काही कार्यकर्त्यांना उद्देशून या निमित्ताने बडोले यांनी लावला. 30 जून पर्यंत चालणाऱ्या या महाअभियानात प्रत्येकाने एकनिष्ठेने कार्य करा.क्षेत्रातील 50 प्रभावशाली कुटुंब शोधणे,आणीबाणी काळातील काँग्रेसचे अघोरी कृत्य जनतेसमोर आणणे,जेष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून बुथ मेळाव्याचे आयोजन करणे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लोकोपयोगी योजनांची माहिती घराघरात पोहोचविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. यावेळी लायकराम भेंडारकर, रचना गहाणे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे संचालन भोजराज लोगडे,प्रास्ताविक विजय कापगते आणि आभार होमराज पुस्तोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *