लक्ष्मी धान गिरणीवर राष्ट्रवादी चा कब्जा

अध्यक्षपदी भोजराम रहेले, उपाध्यक्षपदी राकेश लंजे

सुरेन्द्रकुमार ठवरे
अर्जुनी मोरगाँव – तालुक्यात सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी दि लक्ष्मी सहकारी भात गिरणीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नी आपली पकड मजबूत करुन सत्ता प्रस्थापित केली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोजराम रहेले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच राकेश लंजे निवडुन आले आहेत.

दि.लक्ष्मी सहकारी भात गिरणीची निवडणूक 20 मे रोजी संपन्न होवुन मतदानानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली होती. या निवडणुकीत काॅग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती.तर भाजपा नेही या निवडणुकीत आपली ताकत लावली होती. 13 संचालक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत काॅग्रेस चे सहा , व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा असे बारा उमेदवार महाविकास आघाडीचे निवडुन आले होते. तर भाजप पॅनेलचा एकमेवउमेदवार निवडुन आला होता.त्यामुळे या संस्थेवर महाविकास आघाडीचे निर्विवाद बहुमत प्रस्थापित झाले होते. दि.1 जुन रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणुक बिनविरोध होईल असा अंदाज बांधला गेला होता.मात्र ऐनवेळी काॅग्रेस व राष्ट्रवादी मधे तळजोड होवु न शकल्याने शेवटी निवडणुक घेण्यात आली.


अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कडुन भोजराम रहेले तर काॅग्रेस कडुन प्रमोद पाऊलझगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कडुन राकेश लंजे तर काॅग्रेस कडुन विनोद गहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अध्यक्ष पदासाठी भोजराम रहेले यांना सात मते तर प्रमोद पाऊलझगडे यांना पाच मते मिळाली तर उपाध्यक्ष पदासाठी राकेश लंजे यांना सात मते तर विनोद गहाणे यांना पाच मते मिळाली त्यामुळे अध्यक्षपदी भोजराम रहेले तर उपाध्यक्षपदी राकेश लंजे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडुन आले. काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा- सहा उमेदवार असताना काॅग्रेस चा एक मतदार फितुर झाला तसेच काॅग्रेस च्या महिला संचालक मतदार यांनी ऐनवेळी मतदार प्रक्रियेतून माघार घेतल्याने तथा भाजपाचे एकमेव संचालक मतदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उमेदवारांना मतदान केल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाचे उमेदवार निवडुन आले. या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी मधे बिघाडी झाल्याचे चर्चा तालुक्यात सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *