आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते आधारभूत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

दिनांक 02/०6/2023 रोज शुक्रवार ला दि सहकारी भात गिरणी सौंदड आणि फेडरेशन च्या मका खरेदी केंद्राचे शासकीय गोदाम सौंदड येथे आधारभुत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन अर्जुनी/मोर. विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.रबी हंगामात गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली व उत्पन्न घेतले.मका पिकाला योग्य हमीभाव मिळावा व बळीराजा सुखी व्हावा या दृष्टीने शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.आधारभुत मका खरेदी केंद्रावर हेक्टरी ५४.३० क्विंटल मका १९६२ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येईल. सडक/अर्जुनी तालुक्यातील शेतकरी यांचे मका खरेदी करण्यासाठी मका केंद्र शासकीय गोदाम सौंदड येथे सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला रमेश चुरे अध्यक्ष दि सहकारी भात गिरणी सौंदड,नितीन कांबळे व्यवस्थापक गोदाम,आदित्य अग्रवाल, लेकराम चुटे,विणू अग्रवाल, दयाराम पाटोदे,सीताराम सावरकर, सिद्धार्थ राऊत, संजय निर्वाण आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *