व्रुद्ध कलाकार मानधन समीती जिल्हा गोंदिया ची सभा संपन्न

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री शुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्यात दि07/02/2023 रोजी .व्रुद्ध कलाकार मानधन समीती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून वयोवृद्ध कलावंत जिवनलालजी लंजे, मु.कोहळीटोला आदर्श ता. स/अर्जुनी सदस्य म्हणून उत्कृष्ट नाट्य कलावंत चेतन वळगाये, मु.डव्वा ता. सडक/अर्जुनी.अभिनय सम्राज्ञी ज्ञानेश्वरी ताई कापगते,मु.चिचगड ता. देवरी.साहित्यिक सौ.सुषमाताई यदुवंशी, मु+ता गोंदिया.सुभाष खुणे,मु.वडेगांव(रेल्वे)ता.अर्जुनी/मोर.नानीकराम टेंभरे प्रसिद्ध किर्तनकार,मु. भजियापार ता. आमगांवसुभाष चौधरी उपजिल्हाधिकारी, तर सदस्य सचिव श्रिमती शितल ताई पुंड मैडम अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी. जि. प.गोंदिया यांची निवड करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार दि. ३१/५/२०२३ रोज बुधवार ला . दु. १२.०० वाजे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात समीतीची पहीली सभा जिवनलालजी लंजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रास्ताविक मध्ये पुंड मँडम यांनी प्रकरण निवडीविषयी चे सगळे नियम अटी शर्ती व जि .आर. चे वाचन केले तर मागील तीन वर्षांत आलेल्या सगळ्या अर्जाचे वाचन करुन यादया वितरीत करण्यात आल्या . व पुढील सभेत मागील तीन वर्षात आलेल्या अर्जामधुन पात्र लाभार्थी निवडण्यात येतील असे सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले. सर्व समितीतील पदाधिकारी व अधिकारी यांनी आपले परिचय देऊन मनोगत व्यक्त केले. व जिल्ह्यातील सर्व व्रुद्ध योग्य कलाकारांना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात देण्यात येईल. असे सांगितले व शेवटी आभार प्रभारी समाज कल्याण अधिकारी खामकर साहेब यांनी मानले. तर व्रुद्ध कलाकार मानधन समितीवर सांस्कृतिक व कलाक्षेत्राशी निगडीत सर्वच सदस्य असल्याने योग्य सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.शुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले व जिल्ह्यातील अगदी सेवटच्या टोकापर्यंत असलेल्या व्रुद्ध कलाकारांना यांचा लाभ देऊ असे मत पंचायत समिती सदस्य व व्रुद्ध कलाकार मानधन समीती सदस्य चेतन वळगाये यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *