गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे माजी पालकमंत्री परिणय फुके यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

आमगाव:-गोंदिया जिल्हा महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे माजी पालकमंत्री परिणय फुके त्यांना पोलीस पाटलांच्या विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले मागण्यांमध्ये वेळोवेळी कायद्यांमध्ये बदल होत असल्यामुळे कार्यशाळा घेऊन पोलीस पाटलांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात यावे, पोलीस पाटलांचे मानधन वाढवून 20 हजार रुपये करण्यात यावे, पोलीस पाटलांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे, वारस दाखला देण्याबाबत व अन्य दाखले देण्याबाबत खुलासा करण्यात यावा म्हणजे पोलीस पाटलाद्वारे कोणकोणते दाखले देण्यात यावे याबाबत शासन निर्णय जीआर परिपत्रक आदेशाप्रमाणे खुलासा करून पोलीस पाटलांना माहिती देण्यात यावी, निवडणुकीच्या वेळी पोलीस पाटलांना मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात यावे, व त्यांचा निवडणूक भत्ता देण्यात यावे अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात येत आहे, पोलीस पाटलांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष क वरून 65 वर्ष करण्यात यावे, पोलीस पाटलांना सेवानिवृत्ती नंतर वृद्धापकाळ जगण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर सरसकट एक मस्त 10 लाख रुपये देण्यात यावे, अटल पेन्शन योजना सर्व वयातील पोलीस पाटलांना सरसकट सर्वांना लागू करण्यात यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्या सर्व राशन कार्ड धारकांना अगोदरपासूनच शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या आहे याबाबत शहानिशा करून सर्व पोलीस पाटलांना ही योजना लागू करण्यात यावी, ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पोलीस पाटील भवन निर्माण करण्यात यावे, ज्या पोलीस पाटलांना दोन-तीन किंवा जास्त गावांच्या अतिरिक्त कारभार देण्यात येतो त्याबाबत मोबदला देण्यात यावे इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार कोचे, रामनगर पोलीस स्टेशनचे अध्यक्ष उमेशकुमार बावनकर, जिल्हा संघटक सुभाष अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा ताई चुटे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोज बडोले, सालेकसाचे तालुका अध्यक्ष लालचंद मच्छीये, तिरोडाचे प्रकाश मेश्राम आमगाव चे तालुकाध्यक्ष सुरेश कोरे, चिचगड चे अध्यक्ष तीर्थराज पटले, चंद्रसेन रहांगडाले, राजेंद्र पटले, संतोष बहेकार, प्रतिभा कोरोंडे, संगीता भोयर, गिरधारी राहिले, हेमेश्वरी चौधरी, विजय कापसे तसेच जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य पोलीस पाटील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *