जी प कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

सडक अर्जुनी,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता बारावीचा निकाल घोषित केला. फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत जी प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी येथील विज्ञान शाखेत एकूण ६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी ६७ उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल ९८.५२ असून विद्यालयातून प्रथम महेफुज इसराईल दुधकणोज (७३.६१) दुसरी कु मयुरी योगराज मेंढे (७०.१७)व तृतीय तुषार भुवनेश्वर वंजारी (६९.५०) असून प्रथम श्रेणीत २२, द्वितीय श्रेणीत ४१आणि पास श्रेणीत ४ विद्यार्थी आहेत.तसेच कला शाखेत एकूण ३२ विद्यार्थी परीक्षेला बसलेत पैकी २८ उत्तीर्ण झाले असून निकाल ८७.५०% आहे .

प्रथम श्रेणीत ६,, द्वितीय श्रेणीत १७ आणि पास श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेत प्रथम कु हर्षा मधुकर बोळणे (६६.८३) द्वितीय कु मेघा हंसराज डोंगरवार (६३%)तर तृतीय कु भुमिका सम्राट प्रधान (६२.१७)गुणानुक्रमे प्रथम तिन्ही मुलींनी बाजी मारली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे जी प सदस्य चंद्रकला डोंगरवार, पंचायत समिती सदस्य अल्लाउद्दीन राजानी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगांबर कोरे,उपाध्यक्ष ममिता लांजेवार , सेवानिवृत्त प्र प्राचार्य अनिल मेश्राम, प्राचार्य डी पी डोंगरवार,वर्ग शिक्षक आर जी पुस्तोडे, विषय शिक्षक आर ए बावणकर,रंजीता डोंगरे,वाय वाय मौदेकर,कु प्राची मेंढे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे घरी भेट देऊन भारताचे संविधान , अग्नीपंख , ग्रामगीता, एक एक पेन गुलाब पुष्प आणि पेढा देऊन अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *