पंचशील विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल 100 टक्के

जयंत शिक्षण संस्था आमगाव रेल्वे द्वारा संचालित पंचशील विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा एकूण निकाल 100 टक्के लागला.कला शाखा 100% विज्ञान शाखा 100% कु.कामिनी यशवंतराव रहांगडाले व कु.आदित्य राजेश तुरकर या दोन्ही विद्यार्थिनी संयुक्तरित्या विद्यालयात प्रथम आलेले आहेत. विज्ञान शाखेत प्रथम- कु. कामिनी यशवंतराव रहांगडाले, 441(73.50%)द्वितीय- कु. प्राची डीलेश्वर पटले, 436(72.67% )तृतीय- शर्विल उल्हास चन्नेकर,420,,( 70.00%) कला शाखा**प्रथम -कु.आदित्या राजेश तुरकर 441(73.50%) द्वितीय-कुमारी प्राची काशिनाथ कोटांगले 429(71.50%) तृतीय-कु.दिव्या दिलीप डोये 428(71.33%)

या सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे घरी जाऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. जयंत शिक्षण संस्था आमगाव रेल्वेचे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम,विद्यालयाचे प्राचार्य एस .पी.नंदेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्या करिता शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *