भाजपा प्रदेश महिला मोर्चा महामंत्रीपदी रचना गहाणे यांची नियुक्ती

अर्जुनी मोर:– गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर. तालुक्यातील शिरेगाव बांध येथील रहिवासी जिल्हा परिषद सदस्य रचना चामेश्वर गहाणे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपाचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तथा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील आठ महिलांची प्रदेश महिला मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली .यामध्ये मंजुषा कुद्रिमोती ( रायगड ) छाया देवांग ( नासिक ) स्वाती शिंदे ( सांगली ), मीना मिसाळ (छत्रपती संभाजीनगर) रेखा हाके (लातूर) अलका आत्राम( चंद्रपूर) रश्मी जाधव (मुंबई )रचना गहाणे (गोंदिया) या आठ महिलांची महिला मोर्चाचे प्रदेश महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे .आपण सर्व महिला प्रतिनिधींनी भाजपा संघटनेच्या कामात आजवर उत्साहाने योगदान देत आलात यापुढेही संघटनेच्या वाढीसाठी आपले योगदान मिळावे त्यासाठी आपण जोमाने कामाला लागावे असेही नियुक्ती पत्रकात म्हटले आहे. रचना गहाणे यांनी आपल्या निवडीचे श्रेय गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार, डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा गोंदिया जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री डॉ. परीणय फुके ,खासदार सुनील मेंढे, भंडारा-गोंदिया संपर्कप्रमुख वीरेंद्र अंजनकर, आमदार विजय रहांगडाले ,माजी आमदार हेमंत पटले, संजय पुराम व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहे. अनेक वर्षाच्या कालावधीनंतर प्रदेश महामंत्री पद रचना गहाणे यांचे रूपाने गोंदिया जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यातील महिला मोर्चामध्ये आनंदाचे वातावरण आहे. रचना राहणे यांची महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या महामंत्री पदी निवड झाल्याबद्दल गोंदिया जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्ते ,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध आघाड्यांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते तथा जिल्हा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *