कोरोना एकल महिलेला दिली आर्थिक मदत मिशन वात्सल्य समिती सदस्य अनिल मेश्राम यांचा पुढाकार.

सडक अर्जुनी

सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारीटोला येथील कोरोना एकल महिला पुष्पा गितेंद्र भांडारकर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत.पती निधनानंतर घरात लहान लहान तीन मुली, म्हातारे सासु सासरे, विधवा नणंद व तिची मुलगी एकूण आठ लोक वास्तव्य करतात.घरात कमावता पुरुष कोणी नाही.तीन्ही मुली शिक्षण घेत आहेत तसेच नणंदेच्या मुलीचे शिक्षण सुरू आहे.
राहते घर वादळ पाऊसामुळे अर्धे कोसळले आहे.पावसाळ्यात घर पुर्णतः मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे कधीही कोसळले ही शक्यता नाकारता येत नाही.घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही.अशा अवस्थेत जीव मुठीत घेऊन मोडक्या घरात वास्तव्य आहे.
घरी भेट दिली असता सगळी माहिती जाणून घेतली तेव्हा ताईनी किमान एक खोली बांधकाम करणे आवश्यक आहे असे सांगितले.त्यांच्या घरी आज दि १५ मे रोजी भेट दिली.सोबत तलाठी भगवान नंदागवळी, सेवानिवृत्त शिक्षक आर व्ही मेश्राम होते.एकल महिलेची अडचण लक्षात घेऊन नगदी दहा हजार रुपये मदत देऊन खारीचा वाटा उचलला.
भेटीच्या वेळी ताईने मदतीबद्दल आभार मानले व समाधान व्यक्त केले.
मुलींच्या शिक्षणासाठी मदत मिळेल, चिंता करू नका अशी हिंमत दिली.
समाजातील दानशूर व्यक्तींनी या साठी कृपया मदत करावी असे आवाहन अनिल मेश्राम कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक सडक अर्जुनी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *