ग्रामपंचायत खोडशिवनी येथे रोजगार हमी योजनेंतर्गत सुमारे 50 लाख रुपये कामाचा शुभारंभ सोबतच विविध योजना मंजूर


सडक/अर्जुनी..
ग्रामपंचायत खोडशिवनी येथे शेतकरी शेत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजने अंतर्गत सुमारे पन्नास लाख रुपये खर्चाचे दोन तालाव खोलीकरण व एक नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून यावर सुमारे 500 चे वर मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे सोबतच आधार कार्ड अपडेट नसल्याने काही मजुरांचे नावे mstr मध्ये आले नाही त्यासाठी सतत तीन दिवस आधार कार्ड अपडेट करण्याचा शिबीर लावून 130 नागरिकांचे आधार अपडेट करण्यात आले ग्रामपंचायत खोडशिवनी येथे एकूण 16 अपंग असल्याने ग्रामपंचायत नि आपले स्व उत्पन्नातून देण्यात येणार्‍या 5 टक्के रक्कम नगदी न पोस्टात त्यांचे नावे डिपॉझिट करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या एक वर्षाचे काळात गावांत कोणत्याही कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिचे नावे पोस्टात ग्रामपंचायत एक हजार रुपयाचे समृद्धी कन्या योजनेचे खाते उघडून देणार आहे अशा विविध योजना खोडशिवनी ग्रामपंचायत नि आपले गावातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *