पाणीपुरवठा योजना व गटार योजना तातडी ने शासनाकडे पाठवा- आमदार विजय रहांगडाले चे प्रयत्न

तिरोडा ( गोंदिया )

तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत तिरोडा शहरात आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून नगरात रस्ते बांधकाम झाले असून तिरोडा शहरात पावसाळ्यामध्ये नालीच्या पाण्याची समस्या जाणवत असते यावर उपाय म्हणून आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना मंजूर करण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती यावर शासनाणे नगर परिषद कडून प्रस्ताव मागतिले आहेत सदर योजनेस तांत्रिक मान्यता तपासणीचे अहवाल विभागीय कार्यालय गोंदिया येथे नगर परिषद तिरोडातर्फे सादर करण्यात आले असून सदर योजना सुरु करण्याकरिता तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत आढावा बैठक मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्रादीकरण विभाग नागपूर यांच्या कार्यालयात आमदार महोदयांनी आयोजित केली होती सोबतच नगर पंचायत गोरेगाव येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तृत प्रकल्प DPR च्या तांत्रिक मंजुरीबाबत चर्चा करण्यात आली असून मुख्य अभियंता यांचेकडून मंजुरी प्रदान करण्याचे निर्देश आमदार महोदयांनी दिले आहेत या बैठकीमध्ये प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, मुख्याधिकारी राहुल परिहार उपस्थित होते या योजनेमुळे तिरोडा नगरवासीयांची गटारातील पाण्याची समस्या तसेच गोरेगाव नगरपंचायत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होणार असल्याची माहिती आमदार महोदयांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *